top of page

आमची दृष्टी:

 

 



कोकणातील वेगाने वाढणार्‍या हॉटेल आणि पर्यटन क्षेत्रात, स्थानिक तरुणांना योग्य मार्गदर्शन करून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करुन देणे ,आणि त्यांना स्वावलंबी बनवणे.

 

आमचे ध्येय:


 

 


प्रगतीशील जागतिक आतिथ्य आणि पर्यटन क्षेत्रासाठी नोकरीभिमुख शैक्षणिक अभ्यासक्रम देऊन स्थानिक मनुष्यबळ विकसित करताना ; कोकण प्रदेशावर आपले लक्ष केंद्रित करणे.

 

आमचे संस्थापक:

 


श्री. ज्ञानेश्वर येडगे यांनी  प्रतिष्ठित अश्या 'पुणे विद्यापीठा' कडून हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजीचा चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम यशस्वीरित्या २०११ साली पुर्ण केला.

 

तद् नंतर त्यांनी "पुणे विद्यापीठ" येथून 'मास्टर ऑफ बिझिनेस एडमिनिस्ट्रेशन' ची पदव्युत्तर पदवी मिळवली. यानंतर श्री. येडगे यांनी अध्यापन क्षेत्रात प्रवेश केला आणि "मुंबई विद्यापीठाशी" संलग्न असलेल्या हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयासाठी सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. अलीकडेच त्यांनी सहाय्यक प्राध्यापक म्हणून मुंबईतील इंग्लंड (बीटीईसी)संलग्न खासगी संस्थेत आपला कार्यकाळ पूर्ण केला.

अध्यापन व उद्योग क्षेत्रात ८ वर्षे पूर्ण केल्यावर कोकणातील तरुणांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांनी स्वत: ची संस्था उघडण्याचे ठरविले आणि अशाच प्रकारे "उत्कर्ष अकादमी ऑफ ग्लोबल करियर" ही संकल्पना आखली गेली.

FB_IMG_1550220668421.jpg
bottom of page